Marathi · Poem · Poetry · Spiritual

Marathi poem with translation – मनाचा आरसा (Mind’s mirror)

मनाचा आरसा

आपल्या सर्वांमधे असतो एक आरसा
हा कधी दिसत नाही
पण आपल्या असण्याची
जाणीव नेहमी करून देतो

ज्या भावना आपण स्वतःशी लपवतो
त्यांचं प्रतिबिंब हा दाखवतो
कधी स्वप्नांमधे,
कधी ह्या जीवनाच्या स्वप्नात

हा सगळं शोधून काढतो
आणि मग ह्या मोह-माये मधे
त्या भावनांना व्यक्त करतो
चांगल्या-वाईट परिस्थितीनमध्ये झोकतो

हे सगळं हा आपल्यासाठीच करतो
आपण आपल्या भावनांचे मान करावे
त्यांना शुद्रांसारखे दूर न ढकलता
त्यांच्यामधे पूर्णपणे एकरूप होऊन
त्यानां आपलाच भाग बनवावे
हीच या आरश्याची इच्छा

आरसा म्हणतो,
आरे माणसा, ज्या दिवशी
माझ्यामध्ये मला काहीच दिसणार नाही
त्या दिवशी मी फुटणार आणि
माझ्यासोबत तू ही मुक्त

राधिका

Here is a rough translation of the poem in English :
Inside all of us, there is a mirror – mind’s mirror
We cannot see it, but it makes it’s presence felt.
Whichever feelings we suppress,
This mirror shows us it’s reflection
Either in dreams or in this illusionary world that we live in.
The mirror pushes us into worldly situations
Where we are made to feel these suppressed emotions again
It does this so that we see this feeling, acknowledge it and make it a part of our own being instead of disowning it.
The mirror tells us ‘Human, the day I see no reflection in myself – I will get destroyed and along with me, you will be free from this cycle of Samsara (life, death and rebirth)’
Image credit : https://teejaw.com/self-reflection-can-be-good-for-you/